Breaking News

दुर्गम गावांतही मतदारांचा उत्साही प्रतिसाद

कर्जत, उरणमध्ये 67 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

अलिबाग : जिमाका

मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (दि. 29) मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. त्यांनी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत केलेल्या सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत. विशेषत: अधिकारी व कर्मचार्‍यांनी नियोजनबद्धरितीने मतदानाची जबाबदारी पार पाडली तसेच एक दोन ठिकाणची नादुरुस्त इव्हीएम यंत्रे तातडीने बदलण्याची कार्यवाही झाल्याने कुठेही मतदारांचा खोळंबा झाला नाही, ही समाधानकारक बाब आहे, असेही ते म्हणाले. कर्जतमधील दुर्गम ठिकाणच्या गावांतही मतदारांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला.

मावळ लोकसभा मतदारसंघात 59.49 टक्के मतदान झाले असल्याची माहितीही मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. मावळ मतदारसंघात 22 लाख 97 हजार 405 मतदार असून पनवेल, कर्जत, उरण या रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत मिळून 11 लाख नऊ हजार 250 मतदार आहेत. सोमवारी झालेल्या मतदानात दिव्यांग, ज्येष्ठ तसेच तरुण आणि महिलाही उत्साहाने सहभागी झालेले दिसले तसेच आदिवासी मतदारदेखील मोठ्या संख्येने मतदानासाठी रांगेत उभे राहिलेले दिसले.

सोमवारी रात्रीपासूनच ठिकठिकाणाहून मतदान यंत्रे त्या त्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे जमा होऊन  बालेवाडी येथे स्ट्राँग रूममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. 23 मे रोजी याठिकाणी मतमोजणी होणार आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply