Saturday , June 3 2023
Breaking News

‘माझी गल्ली स्वच्छ गल्ली’चे नवी मुंबईत परितोषिक वितरण

नवी मुंबई : बातमीदार

शेल्टर असोसिएट्स संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई मधील तुर्भे विभाग अंतर्गत ’माझी गल्ली स्वच्छ गल्ली’ ही स्पर्धा इंदिरा नगर, हनुमान नगर, गणपती पाडा या वस्त्यांमध्ये घेण्यात आली.

संस्थेने गोळा केलेल्या जीआयएस तंत्रज्ञानाच्या मदतीने 250 घरांचे पॉकेट बनवण्यात आले. 20 स्वयंसेवकांना निवडून या 250 घरांची जबाबदारी देण्यात आली. विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले. वस्तीमधील स्वयंसेवकांच्या माध्यमातून 6,000 हून अधिक रहिवाशांना स्वच्छ्ता व आरोग्य या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.  वस्तीमधील नागरिकांचा सहभागातून गटार स्वच्छता, रस्ते सफाई ही कामे करण्यात आली. कचरा वर्गीकरण करून तो घेऊन जाण्याची व्यवस्था चांगली करण्यात आली. वेगवेगळ्या परीक्षकांनी या स्पर्धेची विविध निकष घेऊन पाहणी केली आणि मार्क्स दिले त्यानंतर विजेते घोषित करण्यात आले.

तीन वस्त्यांमध्ये माझी गल्ली स्वच्छ गल्ली स्पर्धा घेतली गेली.  या वेळी समाज मंदिर येथे हनुमान नगर येथील 2, इंदिरा नगर येथील 2 आणि गणपती पाडा येथील 1 असे पॉकेट विजेते घोषित करण्यात आले. या सर्व पॉकेटमध्ये  काम करणार्‍या स्वयंसेवकांना या वेळी नवी मुंबई महानगर पालिका उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आणि विजेत्या पॉकेटना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply