Breaking News

ज्येष्ठ नागरिक, निराधार महिलांसाठी विशेष उपक्रम

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना व निराधार माता-भगिनींना त्रास होवू नये यासाठी प्रभाग क्र.18 मध्ये विशेष उपक्रम राबविला आहे.

या वेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व निराधार माता-भगिनीं ज्यांना जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये प्रामुख्याने औषधे, गॅस सिलेंडर, भाजीपाला हे आवश्यक असल्यास  व ते आणण्यासाठी त्यांना अडचणी येत असल्यास त्यांनी या संदर्भात विक्रांत पाटील यांच्या हेल्पलाईन नंबर 9167042666 या क्रमांकावर आपले पूर्ण व पत्ता व्हॉट्सअ‍ॅप करावेे म्हणजे संबंधितांशी तत्काळ संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेवून त्यांना आवश्यक असलेली मदत तात्काळ देण्यात येईल. तरी ज्येष्ठ नागरिक व निराधार माता-भगिनींनी आपल्या मुलास्थानी असलेल्या विक्रांत पाटील यांना सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply