कामोठे : रामप्रहर वृत्त
माणसाने माणसाशी माणसा सम वागणे या संज्ञेला न्याय देण्याचे काम या कोरोना महामारीच्या काळात ‘रॉबिन हूड आर्मी’ ही एनजीओ करत आहे. या एनजीओने कामोठे सेक्टर 20 मधील गरजवंत नागरिकांना तसेच पारधी लोकांना ‘फॅमिली हॅप्पीनेस किट’चे शनिवारी (दि. 12) वाटप केले. या सामाजिक कार्यात अक्षय पात्र या संस्थेचे त्यांना किट उपलब्ध करून दिले आहेत.
रॉबिन हूड आर्मी या एनजीओने 100 नागरिकांना या फॅमिली किटचे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत नवी मुंबई क्षेत्रात तीन हजार नागरिकांना किटचे वाटप करण्यात आले आहे. रॉबिन हूड आर्मी एनजीओचे दीपक सिंग यांनी गरीब व गरजू आढळण्यास आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. या वेळी भाजप भटके विमुक्त जमाती महिला सेलच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, हार्दिक शहा, विनोद खेडकर, मनीषा वणवे, हंसराज वर्मा, वैदेही मॅडम, सागर पाटील आदी उपस्थित होते.