Breaking News

सुभाष पुजारी दुसर्‍यांदा मास्टर महाराष्ट्र श्री

पनवेल ः वार्ताहर

महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांनी नुकत्याच झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मास्टर महाराष्ट्र श्री हा बहुमान दुसर्‍यांदा पटकावून या प्रकारात आपला दबदबा किती आहे हे दाखवून दिले तसेच त्यांची पाँडिचेरी येथे देश पातळीवरील होणार्‍या मास्टर भारत श्री स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. पाँडिचेरी येथे होणार्‍या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्रातर्फे सुभाष पुजारी सहभागी होणार असून राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे  महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमादेखील अधिक उंचावली गेली आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रम याचे उत्तम व आदर्श उदाहरण म्हणजे सुभाष पुजारी. त्यांनी यापूर्वीही  आंतरराष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्ठव या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी व घवघवीत यश संपादन करून परकीय भूमीवर भारताचा झेंडा फडकावला आहे. सुभाष पुजारी यांना महाराष्ट्र पोलीस दलातून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा मिळाल्याच आहेतच, परंतु महाराष्ट्रातील इतर सर्व क्षेत्रांतूनदेखील शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे दिसून येते. पाँडिचेरी येथे होणार्‍या स्पर्धेकरिता शुभेच्छा व जागतिक पातळीवर अव्वल येण्याचे त्यांचे जे ध्येय आहे त्या ध्येयाला गवसणी घालण्याकरिता त्यांना सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply