पेण : वार्ताहर
जिद्दी व मेहनतीमुळे बंजारा समाजाने आपले अस्तित्व टिकून ठेवले असुन समाजाशी आपले नाते ऋणानुबंधनाचे असल्याची भावना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी संत सेवालाल महाराज 283व्या जयंतीनिमित्त मोतीराम तलाव येथील मंदिराजवळ आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली.
या वेळी सर्व समाज बांधवांनी आपल्या पारंपरीक पद्धतीने शाल देऊन नगराध्यक्षांचे स्वागत केले. त्यांच्या सोबत नगरसेविका शहेनाज मुजावर, माजी नगरसेवक जनार्दन जाधव, युवा नेते ललित पाटील, अभिराज कडू आदी
उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सांगितले की, बंजारा समाजाला एक इतिहास असुन या कष्टकरी समाजाने आपल्या जिद्द, चिकाटीने आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे. कठीण परिस्थितीतही बंजारा समाज ठिकठिकाणी तग धरून आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करीत आहे. समाजातील नागरिक नेहमी आपल्या कार्यकमाला बोलावीत असतात यामुळे तुमच्या आमच्यातील नाते घट्ट होत जावो अशी सेवालाल महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते. अशी अशा शेवटी नगराध्यक्षा प्रितम पाटील व्यक्त केली.