Breaking News

माथेरानमध्ये दोन घोड्यांना सरा रोगाची लागण; उपचार सुरु

कर्जत : बातमीदार

मोटार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांच्या प्रवासासाठी घोड्यांचा वापर केला जातो. त्यापैकी दोन घोड्यांना सरा या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यांच्यावर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू असून पशुधन अधिकारी त्या घोड्यांवर विशेष लक्ष ठेवून आहेत.

माथेरानमधील व्यावसायिक राजेश जानकर यांचे घोडे तबेल्यात असताना गेली तीन दिवस काहीच खाद्य खात नव्हते, त्यामुळे त्या घोड्यांना त्यांनी माथेरानमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासणीसाठी आणले. येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल कांबळे यांनी या घोड्यांची तपासणी केली असता त्या घोड्यांना सरा या संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ. कांबळे यांनी या दोन्ही घोड्यांवर उपचार सुरू केले. या घोड्यांना इतर घोड्यांपासून वेगळे करण्यात आले आहेत.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply