पनवेल ः प्रतिनिधी
बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेले कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 11 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आता 11 दिवसांनी वाढला आहे.
मुंबईच्या सत्र न्यायालयात सोमवारी (दि. 28) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. सुनील गोन्साल्वीस उपस्थित होते. विवेक पाटील यांच्यातर्फे अॅड. राहुल ठाकूर यांनी पुढील तारीख मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. तो मान्य करून न्यायालयाने जामीन अर्जासाठी पुढील सुनावणी 11 मार्चला दुपारी 2.45 वाजता करण्याचा निर्णय दिला.
Check Also
‘नेहले पे देहला’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक
सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …
RamPrahar – The Panvel Daily Paper