Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघर कार्निवलचे उद्घाटन

20 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी

खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथे भारतीय जनता पक्षातर्फे खारघर कार्निवल 2022चे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) झाले. या कार्निवलमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद, तर लहान मुलांना विविध खेळण्यांची धम्माल 20 मार्चपर्यंत अनुभवता येणार आहे.
खारघरमधील सेक्टर 15 येथील मैदानावर आयोजित या कार्निवलच्या उद्घाटन समारंभास भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महापालिकेचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना कदम, नगरसेवक निलेश बाविस्कर, अभिमन्यू पाटील, नगरसेविका अनिता पाटील, भाजप शहर सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, युवा नेते समीर कदम, उत्तर रायगड चिटणीस गीता चौधरी, सोशल मीडिया सहसंयोजिका मोना अडवाणी, प्रभाग 4 अध्यक्ष वासुदेव पाटील, उत्तर भारतीय मोर्चा संयोजक विनोद ठाकूर, चिटणीस विपुल चोटलिया, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, मधुमिता जेना, प्रभाग अध्यक्ष आनंदा मोकाशी, सहसंयोजक कांचनकुमार बिरला, क्रिस्टिना, विश्वनाथ इंडी, मीरा गुगे, मोहन बिष्ट, शिवप्रसाद थपलियाल, विजयालक्ष्मी सरकार, दुर्गेश साँखला यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. या वेळी कलाकारांनी पारंपरिक लावणी नृत्य सादर केले. त्याला उपस्थितांनी दाद दिली. या कार्निवलला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply