Breaking News

अलिबागमध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

अलिबाग : प्रतिनिधी

येथील जे. एस. एम. महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 4) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा विभाग प्रमुख प्रा. के. बी. चौगुले यांनी शैक्षणिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशुतोष मेहेंदळे यांनी केले.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, उपप्राचार्य डॉ. नीळकंठ शेरे, अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या प्राचार्य अ‍ॅड. रेश्मा पाटील, प्रा. अशोक जाधव, प्रा. टी. डी. वाल्डे, प्रा. पी. डी. दातार, प्रा. जयेश म्हात्रे, प्रा. श्वेता पाटील, डॉ. मिनल पाटील, प्रा. श्रेया केळकर यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply