Breaking News

रोह्यात प्रवासी जनजागृती अभियान

रोहे : प्रतिनिधी

कोएसोच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व कुसुमताई कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने या महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच प्रवासी जनजागृती अभियान राबविण्यात आले.रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दलाचे निरीक्षक सतीश विधाते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. तुलशीदास मोकल यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुकुमार पाटील यांनी केले.रेल्वे रूळ ओलांडणे, चुकीच्या मार्गाने रेल्वेत चढणे, गाडीच्या दरवाजात किंवा छतावर बसून प्रवास करणे, फाटक बंद असताना ते पार करण्याचा प्रयत्न करणे, रेल्वे रुळांवरून वाहने चालवणे व मनुष्यविरहित फाटक पार करताना सावधानता न बाळगणे या कारणांमुळे रेल्वे अपघात कसे होतात याची माहिती सतीश विधाते यांनी दिली व हे अपघात थांबवण्यासाठी कोणत्या प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले. रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दलाचे सहाय्यक निरीक्षक डी. पी. चौधरी, प्रा. सुकुमार पाटील, प्रा. डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. सीमा भोसले, प्रा. डॉ. सम्राट जाधव, प्रा. नितीन मुटकुळे, प्रा. अनंत थोरात यांच्यासह महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 170 विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सीमा भोसले यांनी आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply