Breaking News

उरण पोलिसांतर्फे अन्नदान

उरण : प्रतिनिधी, बातमीदार

सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा येथील झोपडपट्टीतील गोरगरीब, गरजू मुलांना दररोज एकवेळचे दुपारचे जेवण मोफत दिले जाते. सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात महिला सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांनी व त्यांच्या टीमने सुफल आहाराच्या माध्यमातून मोफत अन्नदान सुरू केले. ते आजही अखंडपणे सुरू आहे.

अनेक दानशूर व्यक्ती या उपक्रमाला मदत करीत असतात. तर अनेक व्यक्ती आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तर काही व्यक्ती विविध सणांचे औचित्य साधून चारफाटा येथे सुफल आहाराच्या माध्यमातून अन्नदान करीत असतात. अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत उरणमधील पोलीस बांधवांनी आपल्या स्व: खर्चातून झोपडपट्टी येथील मुलांना मोफत अन्नदान केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, नाईक धीरज पाटील, युवराज जाधव, कातकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून अशा पोलीस बांधवांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे मत उरणमधील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply