कोकणात येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधी

वायव्येकडून येणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात आकाश निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असल्याने उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता आहे. या संदर्भात हवामान खात्याने पत्रक जारी केले आहे. त्यानुसार 14, 15, 16 मार्च रोजी रायगड, ठाणे, पालघर, मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे. 14 व 15 तारखेला सर्वाधिक जास्त उष्णता असेल, तर 16 तारखेला तुलनेने कमी उष्णता असली तरी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजेच 17 व 18 मार्च रोजी वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 14 तारखेला सर्वाधिक उष्णता जाणवेल, तर 15 व 16 तारखेलाही तुलनेने कमी, पण नेहमीपेक्षा अधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्येही वातावरण पुढील काही दिवस कोरडे असेल, असा अंदाज आहे.

रायगड @ 38 : रायगड जिल्ह्यातील तापमान अचानक वाढले आहे. वाढत्या उष्म्यामुळे रायगडकर हैराण झाले आहेत. अलिबाग चुंबकीय वेधशाळेत सोमवारी (दि. 14) येथील कमाल तापमान 38 अंश सेल्सियश नोंदले गेले. अंगाची लाही लाही करणार्‍या उकाड्याने नागरिक त्रस्त झालेत.

Check Also

The nitropolis 2 slot way to get 10 mBTC free bonus coins to help you Crypto Enjoyment Casino?

Articles Nitropolis 2 slot | Chance Jack – Majetic 7Football Anticipate Games Greeting added bonus …

Leave a Reply