रसायनी : प्रतिनिधी
येथील पिल्ले कॉलेजमध्ये झालेल्या युफेरीया जल्लोषमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार किशोरी शहाणे यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे सादर करण्यात आला. या वेळी ढोल पथकाचा कार्यक्रम तसेच विविध प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या. कॉलेजने कला अॅकॅडमी सुरू करावी व मुलांनी सर्व प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे शहाणे यांनी सांगितले. डान्स कार्यक्रमासाठी शिव ठाकरे हे परीक्षकांच्या भूमिकेत होते. या वेळी काँलेजच्या लता मेनन व निवेदीता श्रेयास मॅडम व कॉलेजचा सर्व स्टाफ व युफेरीया या टीमचे सर्व सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper