Breaking News

नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली प्रभागातील विकासकामांची पाहणी

पनवेल ः वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संंबंधित कंत्राटदारांना व महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या.

प्रभागातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे, नळजोडणी, पेव्हरब्लॉक आदी कामे सुरू आहेत. ही कामे सुयोग्य पद्धतीने होतात की नाही याची पाहणी विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केली.

या वेळी त्या विभागातील नागरिकांशीही चर्चा केली. त्यांना  येत असलेल्या अडीअडचणी जाणून घेतल्या व या संदर्भात संबंधित कंत्राटदारांना व महापालिकेच्या अधिकार्‍यांना तशा सूचना केल्या. ही कामे पूर्णत्वास नेत असल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply