Breaking News

अलिबाग-विरार कॉरिडॉर भूसंपादनाची माहिती द्यावी

बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे निवेदन

उरण : प्रतिनिधी

अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गासाठी होणार्‍या भूसंपादनाबाबत उरण तालुक्यातील शेतकर्‍यांसोबत संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित करून सविस्तर माहिती देण्याबाबत अलिबाग-विरार कॉरिडॉरबाधीत शेतकरी संघर्ष समितीमार्फत पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके व एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर, खजिनदार महेश नाईक, सल्लागार वसंत मोहिते, उपाध्यक्ष रमण कासकर उपाध्यक्ष विलास मढवी, सहसचिव नामदेव मढवी, सुनील पंडित, संजय ठाकूर, सल्लागार रामचंद्र म्हात्रे, संदेश पाटील चिर्ले आदी उपस्थित होते. उरण तालुक्याच्या पूर्व विभागातून अलिबाग-विरार कॉरिडॉर उभारण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने जमिनीची मोजणी करून खुणा केल्या. शेतकर्‍यांनी जमिनीचा जास्तीत जास्त मोबदला मिळावा याबाबत मागणी केली होती. या प्रकल्पात भागिदारी देण्यासंबंधी विचार मांडले होते. त्याचबरोबर नोकरी व इतर सुविधांविषयी मागणी केली होती. त्यानंतर दि. 8 फेब्रुवारी रोजी 16 गावांतील शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनदेखील राज्य शासनास दिले होते, परंतु शासनाने शेतकर्‍यांच्या मागणी निवेदनावर काय चर्चा झाली. कोणता निर्णय घेतला किंवा याबाबत काय प्रक्रीया सुरू आहे, याची माहिती मिळण्याबाबत शासनाने बैठकीचे आयोजन करून माहिती देण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply