Breaking News

रूचिता लोंढे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रत्येक मतदाराकडून घेताहेत आशीर्वाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील पंचशील नगर वसाहत तसेच शहर परिसरात भाजप-आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 1) प्रचार केला. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांची कन्या रूचिता लोंढे यांना भाजप-आरपीआयच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ युतीचे कार्यकर्ते पनवेल परिसरात जोरदार प्रचार करीत असून, रूचिता लोंढे या प्रत्येक मतदारापर्यंत्त पोहचून त्यांचे आशीर्वाद घेत आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरात बुधवारी सायंकाळी करण्यात आलेल्या प्रचारावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेविका दर्शन भोईर, माजी नगसेविका कल्पना ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, संजय जैन, युवामोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply