Breaking News

वढाव येथील यात्रेत भक्तांचा उत्साह व्दिगुणित

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील वढाव गावाची बहिरीदेवाची यात्रा दोन वर्षानंतर या वर्षी मोठया उत्साहात साजरी झाली. या यात्रेत मुंबई, ठाणे, पुणे, कोकणातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वढाव गावातील बहिरीदेवाची यात्रा भरली होती. देव काठ्यांची स्पर्धा आणि छबिना (पालखी) सोबत आपल्या अंगावर काटेरी पेरकुट मारणे ही या यात्रेची वैशिष्ट्ये आहेत. या वेळी तरूणांसह ज्येष्ठ मंडळीही पेरकुटे मारण्यात मग्न होती. बहिरीदेवाच्या मंदिरातून दुपारी बारा वाजता देवाचा छबिना निघाला. या छबिन्यासोबत पारंपरिक गीत गाणार्‍या हजारो महिला व पुरुष होते. वढाव, मोठे वढाव, दिव गावात छबिना फिरवून आणण्यात आला.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply