Breaking News

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपक्रम

लोहोप आरोग्य केंद्रात वर्धापन दिनी विविध कार्यक्रम; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी साधला ऑनलाइन संवाद

खालापूर : प्रतिनिधी

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी या उपक्रमाच्या चौथा वर्धापनदिन खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

भारत सरकारच्या आरोग्य विभागाकडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाचा चौथा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र निवडण्यात आले होते. त्यात रायगड जिल्ह्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश होता. खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापनदिन कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आले होते. डॉ. सुधाकर मोरे आणि जिल्हा आरोग्यवर्धिनी समन्वयक डॉ. सागर काटे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवैया यांनी उपस्थित नागरिक आणि आरोग्य कर्मचार्‍यांशी ऑनलाइन संवाद साधला.

लोहोप उपसरपंच अनंता पाटील, पोलीस पाटील मोहन पाटील यांच्यासह औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक आणि सहाय्यीका, आरोग्य सेवक, आशा गट प्रवर्तक, आशा सेविका, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि रुग्ण या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply