Breaking News

राजर्षि शाहू महाराजांना पालीमध्ये अभिवादन

पाली : प्रतिनिधी

राजर्षि शाहू महाराज यांच्या 100व्या पुण्यतिथी निमित्त पालीमधील नागरिक, तहसीलदार व पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 6) शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन केले. या वेळी शाहू महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करण्यात आले. सामाजिक समतेचे प्रणेते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक समतेची बीजे रोवली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, हभप महेश पोंगडे महाराज, शेतकरी नेते शरद गोळे, बशीर परबलकर, सुभाष मोरे तहसीलदार दिलीप रायण्णावार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply