Breaking News

‘सोनेरी’ कामगिरीबद्दल निखतवर अभिनंदनाचा वर्षाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (52 किलो) इस्तंबुल येथे झालेल्या 12व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. याबद्दल देशभरातून तिचे अभिनंदन होत आहे. निझामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेल्या निखतने गुरुवारी झालेल्या 52 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत थायलंडच्या जितपोंग जुतामासचा 5-0 असा धुव्वा उडवला. पाचही पंचांनी अनुक्रमे 30-27, 29-28, 29-28, 30-27, 29-28 अशा गुणफरकाने निखतच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे एमसी मेरी कोम (2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018), सरिता देवी (2006), जेनी आरएल (2006) आणि लेखा केसी (2006) यांच्यानंतर जगज्जेती म्हणून मिरवण्याचा मान तिने मिळवला. निखतच्या आधी मनिषा (57 किलो) आणि परवीन (63 किलो) यांनी कांस्यपदके पटकावली होती. त्यामुळे 73 देशांतील 310 बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या यंदाच्या स्पर्धेत भारताला एकूण तीन पदके मिळाली. भारताच्या 12 पैकी आठ बॉक्सिंगपटूंना (तुर्कीसह संयुक्तरीत्या सर्वाधिक) उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply