रसायनी ः प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आपटा येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. रायगड जिल्हाध्यक्ष पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा सदस्य ज्ञानेश्वर घरत, पनवेल तालुका उपाध्यक्ष अॅड. संजय टेंबे, सरपंचदत्ता पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर यांच्या सहकार्याने आपटा पिंपळआळी समाजमंदिर येथे सोमवारी (दि. 30) पार पडले.
या शिबिरात 478 ग्रामस्थांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिरासाठी आपटा ग्रामपंचायत सदस्या कीर्ती कदम, मनीषा वाघे, वंदना वाघे, विनोद भोईर, सुहास कदम, रघुनाथ जाधव, सोमनाथ कडू, रवींद्र शेलार, संतोष भोईर, शरद वाघे, अंजुम काझी, अविनाश सावंत, रमेश शेलार, गजानन घासे, गजानन पाटील, प्रदीप पाटील, प्रदीप भोईर, गोपाळ किलांजे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper