Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार’ यांचा बुधवारी गौरव समारंभ

पनवेल : प्रतिनिधी

सर्वसामान्यांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पनवेलच्यावतीने बुधवार दिनांक ०१ जून रोजी सायंकाळी ०४ वाजता खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये ईश्वर शक्तीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात समाजप्रबोधन करीत असलेल्या ‘ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार’ यांचा गौरव समारंभ होणार आहे.  या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांची उपस्थिती लाभणार असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे या समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी राज्याचे माजी मंत्री संजय भेगडे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप अध्यात्मिक सेलचे जिल्हा संयोजक काशिनाथ पारठे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply