Breaking News

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

कामोठ्यात स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे आठवे पुण्यस्मरण रविवारी (दि. 5) कामोठे येथे झाले. या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जय गोपीनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कामोठे येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रल्हाद महाराज शास्त्री संस्थान श्री मलंगगड यांचा सुंदर असा हरिपाठ झाला. सुप्रसिद्ध किर्तनकार डॉ. सुदाम महाराज पानेगावकर संस्थान विश्वशांती केंद्र आळंदी यांनी सुंदर असे गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षमय जीवनाला साजेसे कीर्तन झाले. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून मुंडे साहेबांचा संदेश प्रतिष्ठान माध्यमातून समाजापर्यंत पोहचायचे काम कीर्तनाच्या माध्यमातून करण्यात आले. मुंडे साहेबांनी जो जीवनामध्ये संघर्ष केला त्या संघर्षाचा एक धागा म्हणून जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला या वेळी जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सी.के.टी कॉलेज प्राचार्य एस. के. पाटील, सचिव डॉ. एस. टी. गडदे, पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, माजी सभापती मोनिका महानवर, नगरसेविका पुष्पा कुतरवडे, भाजप चित्रपट आघाडीचे मुंबई अध्यक्ष संदीप घुगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संपदा पारकर, अर्चना लष्कर, किशोर मुंडे, जय गोपीनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे, उपाध्यक्ष अनंत ठोंबरे अन्नदाते, सचिव हनुमंत विघ्ने, खजिनदार संग्राम केंद्रे, मार्गदर्शक बबन बारगजे, सल्लागार पांडुरंग महाराज विघ्ने, नवी मुंबई अध्यक्ष पप्पू सोनवणे, उपाध्यक्ष विठ्ठल घोळवे, मंगेश रहाटे, देविदास बुधवंत, ऋषिकेश सांगळे, संतोष जायभाये, अमोल बिनवडे, व प्रतिष्ठानचे, वडाळा, चेंबूर, ठाणे, नेरूळ, खारघर, कळंबोली व इतर सर्व ठिकाणाहून मुंडेसैनिक उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply