Breaking News

पोसरीच्या सरपंचपदी भाजपच्या सुनिता तोंडे

पनवेल : रामप्रहर वृत्त

पोसरी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक सोमवारी (दि. 13) झाली. या निवडणूकीत भाजपच्या सुनिता तोंडे यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी सरपंच सुनिता तोंडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गाताडे, पंचायत समिती अध्यक्ष सुनिल माळी, केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पोसरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतीश पाटील, माजी सरपंच बाबुराव शीद, भावना जोशी, माजी उपसरपंच नाना भोईर, ग्रामपंचायत सदस्य बंडू शीद, कमलाकर शीद, सुनिता शीद, रामदास भोईर, गाव पाटील सुजीत पाटील, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बळीराम कांबळे, शिवाजी माळी, प्रशांत माळी, निलेश माळी, युवा नेते प्रतीक भोईर, वैभव तोंडे, विशाल जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply