Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत शाळेचा निकाल 100 टक्के लावून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. त्याबद्दल संस्थचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुरुवारी (दि. 23) सत्कार केला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज मधील दहावीच्या निकालामध्य प्रेम मुंबईकर यांने 88.80 टक्के गुण प्राप्त करत प्रथम, 87.60 टक्के मिळवत मृदुला पाटील हिने द्वितीय तर परी गुप्ता हिने 87.20 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. बारावीच्या परीक्षेत राजकुमार म्हात्रे याने 75.17 टक्के गुण मिळवत प्रथम, केया ढवळे हीने 73.50 टक्के मिळवत द्वितीय तर 71 टक्के गुण प्राप्त करून हर्ष ठाकूर याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांचा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सत्कार केला. या वेळी मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजचे चेअरमन भार्गव ठाकूर, प्रभारी मुख्याध्यापिक प्रणिता गोळे उपस्थित होत्या.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply