रिलायन्स नागोठण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
पाली ः प्रतिनिधी
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 49वी जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा नुकतीच भुवनेश्वर (ओडिशा) येथे झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या वॉटर पोलो संघाने द्वितीय, तर मुलांच्या वॉटर पोलो संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये नागोठण्यातील रिलायन्सच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या मुलांच्या वॉटर पोलो संघात सुजल भोय, प्रेम पाटील, रोहित कुथे, सार्थक इंद्रे, आदर्श म्हात्रे, दिनांशू कुथे, प्रयाग जैस्वाल, स्वयं परदेशी, कुश परतानी, अर्जुन देशमुख, यश दत्तानी, यदनेश बुगडले, लव परातानी यांचा समावेश होता, तर मुलींच्या संघात प्रेषिता तरे, श्वेता कुराडे, पूर्वा गावडे, श्रावणी सपाटे, जस्मित्कुर राहाल, सृष्टी भोसले, स्वरा पाटील, याना अग्रवाल, मित्वी दत्तनी, नीम शुक्ला, पल्लवी गुडला, श्रकानी अग्रे, दिशा यादव आदींचा समावेश होता. महाराष्ट्राच्या संघांमध्ये रिलायन्स नागोठण्याचे सात खेळाडू होते. त्यांना आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे, गितेश कुथे, रोशन कुथे, प्रेमराज पिंगळे यांचे यांचे मार्गदर्शन लाभले. रिलायन्स नागोठणेचे अध्यक्ष शशांक गोयल, विनायक किलोस्कर, उदय दिवेकर, इस्टेटचे मॅनेजर अजिंक्य पाटील, सतीश पाटील, अशोक विधाते, श्री. पाठक आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper