Breaking News

मालमत्ता कराचा भरणा करा आणि शास्तीवर 75 टक्के सवलत मिळवा!

पनवेल मनपातर्फे आवाहन

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिकेने सिडको हद्दीतील मालमत्ताधारकांना 31 जुलैपर्यंत शास्तीवरती 75 टक्के सवलत देऊ केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले असून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. या आधीही महापालिकेने मालमत्ता करामध्ये भरघोस सवलत दिली होती. नागरिकांनी शास्तीवरील 75 टक्के सवलत मिळविण्यासाठी 31 जुलैपर्यंत आपला कर भरणा करावा. महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता पीएमसी टॅक्स अ‍ॅप सुरू केले आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी https//:panvelmc.org qH$dm www.panvelmc.org  या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी 30 जुलैला शनिवार आणि 31 जुलैला रविवारी प्रभाग समिती आणि मुख्यालयातील मालमत्ता कर विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहेत.  पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील तळोजा औद्योगिक वसाहत, कळंबोली स्टील बाजार, पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांना मालमत्ता करांमध्ये महापालिकेने 31 जुलैपर्यंत 10 टक्के सवलत दिली आहे. या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी सवतलीचा लाभ घेऊन आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

 

दैनिक कर संकलन

26 जुलै  :   59 लाख

27 जुलै  :   1 कोटी 43 लाख

28 जुलै  :   1 कोटी 35 लाख

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply