Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये बूस्टर डोस लसीकरण

कर्जत : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत भाजप मंडळ आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात बुस्टर डोस लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते, यावेळी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे 153बूस्टर डोस देण्यात आले.

सर्व नागरिकांना सहजतेने बूस्टर डोस उपलब्ध व्हावेत, या उद्देश शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लसीकरण केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, किसान मोर्चा कोकण समन्वयक सुनील गोगटे, कर्जतचे उपनगराध्य अशोक ओसवाल, तसेच दिनेश सोलंकी, विजय कुलकर्णी, मारुती जगताप, मिलिंद खंडागळे, समीर  घरलुटे, प्रशांत उगले, शिरीष  कदम, दिनेश गणिगा, श्रीनिवास राव, अभिजित पटेल, राहुल मसणे, अभिषेक तिवारी, सर्वेश गोगटे, आदित वांजळे, रवींद्र जाधव, दर्पण घारे, विश्वनाथ लोखंडे, गायत्री परांजपे, स्नेहा गोगटे, शर्वरी कांबळे, प्रीती तिवारी, सोनिया गरवारे, पुनम डेरवणकर आदी पदाधिकारी,  कार्यकर्ते व नागरिक या वेळी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply