कामोठे : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली भटके विमुक्त प्रदेश अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार, भटके विमुक्त महिला प्रदेश अध्यक्ष डॉ. उज्वला हाके आणि कोकण विभाग संयोजिका डॉ. समीरा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त महिला आघाडी कामोठे मंडलच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. पोलीस बांधवांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला. कामोठे पोलीस स्टेशनच्या सिनियर पी. आय. स्मिता जाधव, उत्तम जगदाळे आणि त्यांच्या सहकार्यांना भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी राखी बांधली. या वेळी भटके विमुक्त महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा महिला अध्यक्षा विद्या तामखडे, कामोठे मंडल अध्यक्ष अॅड. वैशाली देवडे, संगीता तामखडे, मनीषा बेरगळ, जयश्री पाटील, दिपाली माने, स्वाती धडस, नीलम सरगर, नूतन आलदर, कोमल ओवे, दिपाली चोपडे, उमा राजभल, शोभा यादव, संस्कृती पाटील, भटके विमुक्त कामोठे मंडल संयोजक सागर पाटील आणि प्रथमेश देवडे उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper