Breaking News

लायन्स क्लबकडून मुरूडमध्ये शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी

लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने मुरूड तालुक्यातील कोर्लई आणि मांडला येथील मराठी शाळांना वॉटर प्युरिफायर आणि मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लबचे महेश कवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, भारती जोशी, प्रसाद साळावकर, सदस्य, जिपच्या माजी सदस्य राजश्री मिसाळ, कोर्लई शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कवळे, मांडला शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा नांदगावकर, शिक्षक रमाकांत ठाकूर, हेमंत भोईर, अस्मिता भगत, हर्षला ठाकूर यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शिक्षक नितीन पाटील यांनी अलिबाग लायन्स क्लब सदस्यांचे आभार मानले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply