Breaking News

पनवेल महापालिकेची नियमीत लसीकरणाविषयी कार्यशाळा

पनवेल : प्रतिनिधी

जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात नियमीत लसीकरण कृती आराखडा तयार करणे तसेच नागरी नियमीत लसीकरण बळकटी करण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे उच्च वैद्यकिय अधिकारी डॉ. काटकार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

या वेळी आरसीएच अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारिका उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये नियमित लसीकरण कृती आराखडा तयार करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्व्हे करणे, हाय रिस्क एरिया शोधणे, प्रमाणीत यादी तयार करणे, नकाशे तयार करणे, क्षेत्र सीमांकन करणे याविषयी माहिती दिली. तसेच नियमीत लसीकरणाने बाळांचे, गरोदर मातांचे होणारे बळकटीकरण याविषयी माहिती  देण्यात आली.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply