पनवेल : वार्ताहर
ब्यूटिफुल मॉलतर्फे पनवेलमध्ये मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जवळपास 110 स्टाफचा मेडिकल हेल्थ चेकअप करण्यात आले. याच्यामध्ये ईसीजी सोनोग्राफी, एक्स-रे, ब्लड ग्रुप यासह अनेक प्रकारे तपासणी करण्यात आली. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सुदृढ राहिले पाहिजे. आपले शरीर चांगले असेल तर आपण कोणतेही काम वेळेत करू शकतो यासाठी या मेडिकल कॅम्पच्या आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये मेडिसिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी येथील स्टाफची संपूर्ण तपासणी केली. यावेळी ब्यूटीफुलचे प्रमुख प्रमोद एन चौधरी यांनी डॉक्टर्स आणि मेडिसिटीच्या सर्व डॉक्टर व कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper