पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्हा जलतरण संघटना व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 11) उलवा नोडमध्ये रायगड जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी 2019 स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी रायगड जिल्हा जलतरण संघटनेचे कार्याध्यक्ष रवींद्र भगत, सचिव पांडुरंग म्हात्रे, महेंद्र पाटेकर, सदस्या मनस्वी पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. निवड झालेले स्पर्धक नाशिक येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे…
ग्रुप 1 मध्ये 17 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर फ्रीस्टाईल प्रियांशु सुनील पाटील याने प्रथम क्रमांक, महंत पांडुरंग म्हात्रे द्वितीय क्रमांक पटकावला, मुलींमध्ये कीर्ती हंबीर ही प्रथम, तर ईशिता पांडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. 100 मिटर फ्रीस्टाईलमध्ये मुलांमध्ये प्रियांशु सुनील पाटील याने बाजी मारली. मुलींमध्ये कीर्ती हंबीर ही प्रथम, तर ईशिता पांडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. ग्रुप 2 मध्ये 14 वर्षांखालील 100 मिटर फ्रीस्टाईल मुलांमध्ये नील योगेश वैद्य याने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रुप 3 मध्ये 11 वर्षांखालील गटात अथर्व चेतन म्हात्रे हा पहिला आला.
ग्रुप 1 मध्ये 17 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर ब्रेस्ट्रोक प्रियांशु सुनील पाटील याने प्रथम क्रमांक, महंत पांडुरंग म्हात्रे द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींमध्ये कीर्ती हंबीर ही प्रथम, तर आर्या देशपांडे ही द्वितीय आली. ग्रुप 1 मध्ये 17 वर्षांखालील मुलांमध्ये 100 मिटर ब्रेस्ट्रोक प्रियांशु सुनील पाटील हा पहिला आला. ग्रुप 2 मध्ये 14 वर्षांखालील मुलांमध्ये 100 मिटर ब्रेस्ट्रोक नील योगेश वैद्य हा पहिला आला.
ग्रुप 2 मध्ये 14 वर्षांखालील मुलांमध्ये 200 मिटर ब्रेस्ट्रोक अथर्व लोधी हा पहिला आला. ग्रुप 2 मधील 14 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर ब्रेस्ट्रोक अथर्व लोधी प्रथम, नील वैद्य द्वितीय, तृतीय क्रमांक अगस्त्य नाईक याने पटकावला.
ग्रुप 3 मधील 11 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर ब्रेस्ट्रोक अथर्व चेतन म्हात्रे प्रथम, ग्रुप 4 मधील 10 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर ब्रेस्ट्रोक अर्जुन नाईक प्रथम. ग्रुप 2 मधील 14 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर फ्रिस्टाईल अथर्व लोधी प्रथम, अरविंद अय्यर द्वितीय, तृतीय अगस्त्य नाईक. ग्रुप 2 मधील 14 वर्षांखालील मुलींमध्ये 50 मिटर फ्रिस्टाईल त्रिशा गावंड प्रथम.
ग्रुप 4 मधील 10 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर फ्रिस्टाईल अर्जुन नाईक प्रथम, इंद्रनिल पांडे द्वितीय, तर अवनिश अवसाटे याने तृतीय क्रमांक पटकावला. ग्रुप 3 मधील 14 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर फ्रिस्टाईल अथर्व चेतन म्हात्रे प्रथम, साई संतोष पाटील द्वितीय, तृतीय क्रमांक रुद्रा सितम याने पटकावला.
ग्रुप 4 मधील 10 वर्षांखालील मुलांमध्ये 100 मिटर फ्रिस्टाईल अर्जुन नाईक प्रथम, तर द्वितीय क्रमांक इंद्रनिल पांडे. ग्रुप 1 मधील 17 वर्षांखालील मुलांमध्ये 200 मिटर फ्रीस्टाईल महंत म्हात्रे प्रथम, ग्रुप 2 मधील 14 वर्षांखालील 200 मिटर फ्रिस्टाईल मुलांमध्ये नील वैद्य, राज संतोष पाटील 400 मिटर फ्रीस्टाईल यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
ग्रुप 1 मधील 17 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर बटरफ्लाय प्रियांशु सुनील पाटील प्रथम, ग्रुप 2 मध्ये 14 वर्षांखालील मुलांमध्ये नील वैद्य, अथर्व लोधी याने 50 मिटर बॅकस्ट्रोक प्रथम क्रमांक पटकावला. ग्रुप 3 मधील 11 वर्षांखालील मुलांमध्ये 50 मिटर प्लाय अथर्व चेतन म्हात्रे, 14 वर्षांखालील 100 मिटर बॅकस्ट्रोक अथर्व लोधी याने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रुप 2 मधील 14 वर्षांखालील मुलांमध्ये 800 मिटर फ्रीस्टाईल आणि 1500 मिटर फ्रीस्टाईल राज संतोष पाटील प्रथम क्रमांक पटकावला. ग्रुप 3 मधील 11 वर्षांखालील 50 मिटर बॅकस्ट्रोक मुलांमध्ये अथर्व चेतन म्हात्रे याने प्रथम क्रमांक पटकावला.