पणजी : देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असताना काँग्रेसला गोव्यात जबरदस्त धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी बुधवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. गोव्यात काँग्रेसचे 11 आमदार आहेत. त्यापैकी दिगंबर कामत, मायकल लोबो, दियालया लोबो, राजेश फळदेसाई, रदाल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर या आठ आमदारांनी ‘हाता’ची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले.
Check Also
उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …
RamPrahar – The Panvel Daily Paper