Breaking News

‘शेल इंडिया’च्या कामगारांना मिळणार तब्बल 95 हजार रुपये बोनस

पनवेल : रामप्रहर वृत्त
औद्योगिक क्षेत्रात विशेषतः पगारवाढ किंवा तत्सम करारनामा होत असतो, परंतु तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी दिवाळी बोनसचा आगळावेगळा आणि भूतो न भविष्यति असा करार झाला आहे.
या करारानुसार यंदाच्या वर्षी दिवाळी बोनस म्हणून प्रत्येक कामगाराला तब्बल 95 हजार रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही बाब येथेच थांबली नाही, तर पुढच्या वर्षी एक लाख पाच हजार, तर त्याच्या पुढील वर्षी एक लाख 15 हजार रुपये बोनस कामगारांना मिळणार आहे. ही कामगिरी केली आहे आमदार प्रशांत ठाकूर व कामगार नेते जितेंद्र घरत यांनी. त्यामुळे दिवाळीच्या एक महिन्यापूर्वीच या कंपनीतील 40 कामगारांची दिवाळी झाली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीत शेल इंडिया लिमिटेड ही ऑइल कंपनी आहे. या ठिकाणी पूर्वी काँग्रेसची कामगार संघटना कार्यरत होती, मात्र येथील कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेल इंडिया एम्प्लॉईज संघटनेचे आधारवड म्हणून कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची सल्लागार, तर अध्यक्ष म्हणून कामगारनेते जितेंद्र घरत यांच्या कार्याला पसंती दिली.
देशातील सर्वांत मोठा असलेला दीपावली सण एक महिन्यावर आला आहे व दिवाळी बोनस हा कामगारांचा नेहमीच जिव्हाळ्याचा प्रश्न राहिला आहे. त्या अनुषंगाने संघटनेकडून कंपनी व्यवस्थापनाला बोनस मागणीचे पत्र देऊन चर्चा घडविण्यात आली आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय घेत कामगार व कंपनी हिताचा निर्णय घेतला. या करारामुळे कामगारवर्गात आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर, कामगारनेते जितेंद्र घरत यांचे आभार व्यक्त केले.
या करारावर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत, व्यवस्थापनाच्या वतीने मार्केटिंग व्यवस्थापक गुलशन चौधरी, एचआर व्यवस्थापक शशांक शेखर, उत्पादन निर्मिती व्यवस्थापक सागर करूळकर, संघटनेच्या सचिव समीरा चव्हाण, कामगार प्रतिनिधी रामदास गोंधळी, सुनील पाटील, जयराज जाधव, यासिन शेख, अनिल पावशे, सुनील हरिश्चंद्र यांनी स्वाक्षर्‍या केल्या.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply