अलिबाग : प्रतिनिधी
वार्षिक लेखा विहीत वेळेत स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयाकडे राज्यात प्रथम सादर करण्याचा बहुमान रायगड जिल्हा परिषदेने मिळविला आहे.
गतिमान प्रशासन आणि पारदर्शक कामकाज यामुळे राज्यात रायगड जिल्हा परिषदेने आपले वेगळेपण जपले आहे. जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा लेखा झेडपीएफएमएस या ऑनलाइन प्रणालीमध्ये तयार केला असून, वार्षिक लेखा विहीत वेळेत स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयाकडे सादर करण्याचा राज्यात पहिला बहुमान रायगड जिल्हा परिषदेने मिळविला आहे.
झेडपीएफएमएस या ऑनलाइन प्रणालीमुळे अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय मान्यता, कार्यादेश, देयक तयार करणे, देयक तपासणी सूची, अखचित रक्कम शासन खाती भरणा करणे, या बाबी अत्यंत सोप्या व सुटसुटीत झाल्या आहेत. ग्रामविकास विभागाने तयार केलेल्या झेडपीएफएमएस या संगणकीय प्रणालीमध्ये कामकाज पूर्ण करून सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा लेखा विहीत वेळेत स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयाकडे सादर करण्याचा पहिला बहुमान रायगड जिल्हा परिषदेला मिळाला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे यांचा सततचा पाठपुरावा आणि मार्गदर्शनाखाली सहाय्यक लेखाधिकारी छगन मावची व झेडपीएफएमएस राज्य समन्वयक संजीवनी घरत यांनी हे कामकाज विहीत वेळेत पूर्ण केले. वित्त विभागातील लेखा शाखेने केलेल्या कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
Check Also
पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper