Breaking News

पनवेलमध्ये रस्ता काँक्रीटीकरणाचे परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत माजी नगरसेवक मुकीद काझी यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 18मध्ये पाडा मोहल्ल्यातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून होणार्‍या या कामाचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) झाले. या भूमिपूजन समारंभास माजी नगरसेवक नितीन पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, युवा नेते जवाद काझी, सुफयान पटेल, निसार सय्यद, मतीन मास्टर, जावेद मास्टर, निशार पटेल, अस्लम मास्टर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply