पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 8) 17 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि तब्बल 776 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 516 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील नऊ, उरण, पेण व अलिबाग प्रत्येकी दोन आणि खालापूर व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 279, अलिबाग 114, रोहा 78, पेण 76, माणगाव 49, खालापूर 44, कर्जत 36, उरण 35, तळा 21, महाड 14, मुरूड 13, म्हसळा सहा, सुधागड व पोलादपूर प्रत्येकी चार आणि श्रीवर्धन तीन असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 32,900 व मृतांची संख्या 920 झाली आहे. जिल्ह्यात 26,617 जण कोरोनामुक्त झाल्याने 5363 विद्यमान रुग्ण आहेत.