Breaking News

पनवेल महापालिका जनसंपर्क विभाग प्रमुखपदी प्रफुल घरत

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क, जनगणना, संख्याकी आणि अभिलेख विभाग प्रमुखपदी प्रफुल घरत यांची नियुक्ती झाली आहे. आयुक्त गणेश देशमुख आणि आस्थापना विभागाचे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या सुचनेनूसार माहिती व जनसंपर्क, जनगणना, संख्याकि आणि अभिलेख विभाग प्रमुखपदी प्रफुल्ल घरत यांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन ओवे ग्रामपंचायतमध्ये लिपिकपदी काम केल्यानंतर पनवेल महापालिकेमध्ये त्यांनी गेली सहा वर्षे लिपिकपदी काम केले आहे. यामध्ये आस्थापना विभागात त्यांनी जवळपास तीन वर्षे काम केले. त्यानंतर माहिती व जनसंपर्क विभागामध्ये ते लिपिकपदी काम करत होते.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply