आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधील चिखले येथे विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील चिखले येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, नळ पाणीपुरवठा योजना राबविणे तसेच आरोग्य उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 17) झाले.
पनवेल तालुक्यात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची अनेक मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या आमदार निधीतून चिखले येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान 15व्या वित्त आयोगांतर्गत आयोग्य उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी झाले.
या समारंभास भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, माजी जि. प. सदस्य अमित जाधव, माजी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, कोनचे माजी सरपंच निलेश म्हात्रे, चिखले ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच सुरेखा पाटील, रमेश गडकरी, रवींद्र गडकरी, विनायक पाटील, सूर्यकांत पाटील, पद्मिनी गडकरी, जयश्री पाटील, निकीता पाटील, हिरामण पाटील, राम फडके, नामदेव पाटील, नामा पाटील, गोमा पाटील, दत्तात्रय म्हात्रे, रघुनाथ पाटील, जनार्दन बडे, सागर गायकर, दामू गडकरी, बाळू चंदने, तुकाराम पाटील, भगवान पाटील, भुषण पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply