Breaking News

सुधागडात भातकापणी व झोडणीच्या कामांना वेग

पाली ः प्रतिनिधी

पाली-सुधागडात आता भातकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसानंतर उरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. मजुरांची कमतरता भासत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य कामाला लागली आहेत. यामध्ये तरुणदेखील आहेत.    नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून शेतीच्या कामाला गावी आली आहेत. वकाळी पाऊस व अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेत आहेत. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने कामे जलदगतीने आटपून घेत आहेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्रीचा वापर करीत आहेत. यामध्ये श्रम वेळ व पैसा बचत होत आहे.  तरुण शेतकरी अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले की, सध्या कापणीच्या वेळी काही शेतात पाणी साचलेले असते. अनेक शेती खाडी, नदी व तळ्याच्या शेजारी आहेत. येथील ताजी मासळी पकडून मस्त कालवण बनवतात आणि सगळेजण ताव मारतात. या वेळी सुखदुःखाच्या गोष्टी देखील होतात. लोकगीतेसुद्धा म्हणतात.

मजुरी वाढल्याने कुटुंबातील व अन्य नातेवाईकांच्या मदतीने आळीपाळीने कामे करीत आहेत. या कामात सुशिक्षित तरुण व महिलाही सहभागी होत आहेत, याचे समाधान मिळते.

-राम तुपे, तरुण शेतकरी, कोंडगाव

 

व्यवसाय सांभाळून सहकुटुंब शेतीची कामे करतो.शिवाय पुढील पिढीला शेतीबद्दल आत्मियता निर्माण होते. यातून शेती टिकवण्यासाठी ते प्रयत्न करतील.

-निलेश शिर्के, व्यवसायिक, पुई

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply