Breaking News

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त
मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व नगरसेवक परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने आगामी काळातील नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, मतदार यादीसंदर्भातील त्रुटी व अद्ययावतीकरणाचे कामकाज तसेच बूथस्तरीय तयारीचा सविस्तर आढावा घेत सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीला महापौर नितीन पाटील, नगरसेवक विकास घरत, अमर पाटील, प्रवीण पाटील, सुमित झुंजारराव, दशरथ म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मतदारसंघातील प्रत्येक बूथ अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर देण्यात आला. संघटनात्मक बळकटीकरण आणि आखलेल्या योजनांची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply