अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सध्या जत्रांचा हंगाम सुरु आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्ष कुठेही जत्रा झाल्या नव्हत्या. आता निर्बंध उठवण्यात आले आहेत. दोन वर्षानंतर जत्र भरत असल्यामुळे या जत्रांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जत्रांमध्ये परप्रांतीय विक्रेते जास्त आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
आवास, कनकेश्वर, साजगावच्या बोंबल्या विठोबा यांच्या यात्रा झाल्या. सध्या अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील विठ्ठलची यात्रा सुरू आहे. पाच दिवस चालणार्या या यात्रेला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दररोज सुमारे 20 ते 25 हजार भाविक यात्रेला भेट देत आहेत. यात्रेच्या निमित्ताने कपडे, चादरी, पडदे, शोभेच्या वस्तू, आकर्षक फुले, भांडी, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांची रेलचेल आहे.
त्यामुळे ग्राहकांनी खरेदीवर जोर दिला आहे. यात्रेत कपडे, भांडी आणि खेळणी यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.
अडीशे ते तीनशे रुपयाला मिळणार्या चादरी चारशे रुपयाला मिळत आहेत. दोनशे रुपयांचे पडदे अडीचशे रुपयांना विकले जात आहेत. आकाश पाळण्याचा दर प्रति व्यक्ती 100 रुपये आहे. पूर्वी 70 ते 80 रुपयांना मिळणारी खेळणी 100 ते 120 रुपयांना विकली जात आहे.
Check Also
खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …
RamPrahar – The Panvel Daily Paper