Breaking News

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षा गुणगौरव समारंभ खांब रोहा येथे आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
सीकेटी विद्यालयातील सौम्या अमित पाटील, वेद मिलिंद नामे, सार्थक सुहास माने या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय पारितोषिक मिळवत प्रत्येकी एक हजार रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त केले; तर पल्लव आशिष म्हात्रे, हर्षद धीरज पाटील, रौनक मनोहर पाटील, तनिषा नितीन देवाडकर, अर्णव सचिन आवटी, अंकुश अभिजित सामंत, दुर्वा देविदास पाटील, मृण्मयी प्रशांत गोसावी, अर्णव श्रीपत घरत या नऊ विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय पारितोषिकासह चषक व प्रमाणपत्र मिळविले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर सरोज जितेकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, सीकेटी विद्यालयाचे निरीक्षक संतोष चव्हाण, मुख्याध्यापिका स्वाती काळे, पर्यवेक्षिका नीरजा अदुरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

सीकेटी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला‍, …

Leave a Reply