Breaking News

26 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 110 तर सदस्य पदासाठी 580 उमेदवारी अर्ज

पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील 26 गामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 110 तर सदस्यांसाठी 580 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पाटणोली व मुंढाणी या ग्रामपंचायतींमध्ये एकच उमेदवारी अर्ज आल्याने या दोन्ही गामपंचायतीत सरपंचपद बिनविरोध झाले आहेत.
करोटीमध्ये सरपंचासाठी दोन तर सदस्य 15 अर्ज, आंबिवलीत सरपंचासाठी दोन तर सदस्य 15 अर्ज, सावरसईत सरपंचासाठी तीन अर्ज तर सदस्य 19 अर्ज, वाशिवलीत सरपंचासाठी दोन अर्ज तर सदस्य 17 अर्ज, कणेमध्ये सरपंचासाठी पाच अर्ज तर सदस्य 18 अर्ज, कोलेटीत सरपंचासाठी सात अर्ज तर सदस्य 19 अर्ज, निगडेमध्ये सरपंचासाठी चार अर्ज तर सदस्य 25 अर्ज, वरपमध्ये सरपंचासाठी आठ अर्ज तर सदस्य 21 अर्ज, पाटणोलीमध्ये सरपंच बिनविरोध तर सदस्य 15 अर्ज, हमरापूरमध्ये सरपंचासाठी चार अर्ज तर सदस्य 29 अर्ज, कळवेमध्ये सरपंचासाठी पाच अर्ज तर सदस्य 30 अर्ज, आमटेममध्ये सरपंचासाठी सात अर्ज तर सदस्य 22 अर्ज, डोलवीत सरपंचासाठी चार अर्ज तर सदस्य 29 अर्ज, जितेमध्ये सरपंचासाठी तीन अर्ज तर सदस्य 44 अर्ज, दुरशेतमध्ये सरपंचासाठी चार अर्ज तर सदस्य 19 अर्ज, वरसईमध्ये सरपंचासाठी चार अर्ज तर सदस्य 17 अर्ज, दादरमध्ये थेट सरपंचासाठी तीन अर्ज तर सदस्य 31 अर्ज, सोनखारमध्ये सरपंचासाठी पाच अर्ज तर सदस्य 17 अर्ज, कोप्रोलीत थेट सरपंचासाठी चार अर्ज तर सदस्य 17 अर्ज, मसद बु. मध्ये सरपंचासाठी चार अर्ज तर सदस्य 21 अर्ज, सापोली सरपंचासाठी तीन अर्ज तर सदस्य 22 अर्ज, रोडेमध्ये सरपंचासाठी सहा अर्ज तर सदस्य 24 अर्ज, मळेघरमध्ये सरंपचासाठी सात अर्ज तर सदस्य 20 अर्ज, खरोशीमध्ये सरपंचासाठी चार अर्ज तर सदस्य 24 अर्ज, कारावमध्ये सरपंचासाठी आठ अर्ज तर सदस्य 45 अर्ज, मुंढाणीमध्ये सरपंच बिनविरोध तर सदस्यपदासाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत.

Check Also

‘कॅपिटॉल’ची इमारत 98 वर्षांची झाली…

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर उतरून बाहेर पडणार्‍या आजच्या जेन झी पिढीतील काही जण पलिकडच्या फूटपाथवरील …

Leave a Reply