उरण : वार्ताहर
आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार स्थानिक विकास निधी (२०२५-२६) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील कामठा अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन रविवार ( दि. २९) मार्च रोजी आमदार महेश बालदी याच्या हस्ते झाले. अंदाजे २५ लाख रुपये खर्चून साकारलेल्या या विकासकामामुळे परिसराच्या विकासाला नवी गती मिळाली आहे.हा रस्ता केवळ अंतर्गत दळणवळणासाठीच नाही, तर नागाव व म्हातवली या भागाला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. उरण शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, हा बाह्य रस्ता (बायपास) म्हणून अत्यंत उपयोगी पडणार असून, यामुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. यावेळी भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक राजेश ठाकूर , ठाकूर, सायली म्हात्रे, दमयंती म्हात्रे, सायली पाटेकर आणि गणेश पाटील आदि उपस्थित होते ,त्याच बरोबर सीमा घरत विशाल पाटेकर, देवेंद्र घरत, निलेश पाटील, दीपक ठाकूर, राज दीपक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या रस्त्याच्या कामाचे कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर) म्हणून राज ठाकूर यांनी दर्जेदार काम पूर्ण केले आहे.आमदार निधीतून हा महत्त्वपूर्ण रस्ता उपलब्ध झाल्याबद्दल चाणजे, कामठा, नागाव आणि म्हातवली परिसरातील ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी व उपस्थित मान्यवरांचे आभार
मानले. आहेत.
Check Also
परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …
RamPrahar – The Panvel Daily Paper