उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत माजी व विद्यमान सदस्यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात बुधवारी (दि. 14) उरण येथील संपर्क कार्यालयात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये शेकापचे विनय तांडेल, माजी सदस्या अर्चना विनय तांडेल, माजी सदस्य कल्पेश तांडेल, विद्यमान सदस्य प्रीती कल्पेश तांडेल व शिवसेनेचे माजी सदस्य रुपेश पाटील आदींनी जाहीर केला आहे. या पक्षप्रवेशावेळी उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, सुधीर घरत, शेखर तांडेल, रवी वाजेकर, उरण तालुका सरचिटणीस कैलास भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
Check Also
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रायगडातील खेळाडूंचे यश
परेश ठाकूर यांच्याकडून कौतुक अन् बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्तपुणे, इंदापूर आणि जुन्नर येथे झालेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper