पनवेल-प्रतिनिधी
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त उत्तर रायगड भाजपच्यावतीने ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पनवेल, उरण, कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकताच पार पडल्या. या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या शिलेदारांचा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सन्मान करण्यात येणार आहे.
Check Also
उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …
RamPrahar – The Panvel Daily Paper