Breaking News

भारतीय महिला हॉकी संघ जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकच्या सराव स्पर्धेकरिता भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे. सुनीता लाकरा आणि ज्योती या अनुभवी खेळाडूंना संघातून वगळ्यात आले असून, युवा खेळाडू शर्मिला देवी आणि रीना खोखार यांना संधी देण्यात आली आहे.

हिरोशिमा येथे झालेल्या एफआयएच महिला सीरिज फायनल्स हॉकी स्पर्धेसाठी निवडलेला संघ कायम ठेवण्यात आला असून, फक्त दोन बदल करण्यात आले आहेत. रीनाला दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले होते, पण तिने संघात पुनरागमन केले असून, शर्मिला राष्ट्रीय संघाकडून पदार्पण करणार आहे.

आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडेच संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानी असून, त्यांना दुसर्‍या क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया, चीन (11वे स्थान) आणि यजमान जपान (14वे स्थान) यांसारख्या खडतर प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply